Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : स्वतः जाता कि काढून टाकायचे ? भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोदी सरकारची तंबी

Advertisements
Advertisements
Spread the love

मोदी सरकारने आता भ्रष्टाचारी आणि अयोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध कंबर कसली आहे. अशा कर्मचाऱ्यांना शोधून काढण्याचे निर्देश दिले सरकारने दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता सरकारची कडक नजर असणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना लवकरच गच्छंती करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या रेकॉर्डची तपासणी करणार आहे. यासाठी सरकारने दिशा-निर्देशही दिले आहेत. याअंतर्गत अकार्यक्षम आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील आरोपाची तपासणी करण्यात येईल. जे कर्मचारी भ्रष्ट आणि कामचुकार वा अयोग्य असल्याचे दिसून येईल त्यांना सेवानिवृत्त होण्यासाठी सांगण्यात येणार आहे. याबाबत एक रजिस्टर तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

Advertisements

केंद्राच्या दिशा-निर्देशांनुसार केंद्र सरकारने सरकारी सेवांमधील विविध विभागांमध्ये ३० वर्षे पूर्ण केलेल्या ५०-५५ वर्षांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डची तपासणी करण्यास सांगण्यात आले असून या कर्मचाऱ्यांवरील अकार्यक्षमत्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाची तपासणी केली जाईल. केंद्राने सांगितले की सर्विस रेकॉर्डच्या तपासणीनंतर तत्सम कर्मचारी योग्य काम करीत होता की त्याला वेळेपूर्वी सेवानिवृत्त करावयाचे याचा निर्णय घेतला जाईल.  दरम्यान या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड परीक्षण केल्यावर त्यांना सेवेत ठेवायचे कि त्यांना स्वेच्छा निवृत्तीचा नारळ द्यायचा याबाबत निर्णय घेतला जाईल.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!