Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्यात डेअरी मालकासह ११ कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याच्या वृत्ताने खळबळ , संपर्कातील व्यक्तींचा शोध चालू …

Spread the love

पुण्याच्या हडपसर येथील एका प्रसिद्ध दूध डेअरीच्या मालकासह ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मगरपट्टा व हडपसर परिसरात एकच खळबळ पसरली आहे. मागील चार दिवसांपूर्वी डेअरीच्या कर्मचाऱ्याला करोनाची लक्षणे दिसत असल्याने तपासणी करण्यात अली होती. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट आल्याने डेअरीच्या मालकासह ११ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला असून ११ जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या डेअरीमधून जवळील सोसायटीच्या ज्या नागरिकांनी दूध, लस्सी ,समोसे व स्वीटचे पदार्थ खरेदी केलेले आहे, त्या सर्वांची महापालिकेच्या पथकाकडून प्राथमिक तपासणी करण्याचे काम सकाळीच सुरू करण्यात आलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात देखील ही डेअरी सुरू होती. या डेअरीतून अनेक ठिकाणच्या नागरिकांनी दूध, लस्सी, समोसे व स्वीट अशा विविध पदार्थांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे या डेअरीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क आलेल्या नागरिकांची शोध घेणं हे महापालिकापुढचं मोठं आव्हान आहे. डेअरी मालकासह ११ जणांना करोना झाल्याच्या वृत्तास हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांनी दुजोरा दिला आहे. ‘सकाळपासूनच डेअरीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यापैकी कुठल्याही नागरिकामध्ये करोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!