AurangabadNewsUpdate : जिल्ह्यात आज 46 रुग्णांची वाढ, 484 रुग्णांवर उपचार सुरू, एकूण रुग्ण संख्या 1453

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 46 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1453 झाली आहे. यापैकी 901 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 484 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, कटकट गेट (1), कैलास नगर, माळी गल्ली (1), एन सहा सिडको (1), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (1), कैलाश नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), खंडोबा मंदिर, सातारा गाव (2), इटखेडा (3), उस्मानपुरा (3), जुना बाजार (1), विश्रांती कॉलनी एन 2 (3), नारळी बाग गल्ली नं.2 (1), राशेदपुरा, गणेश कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.1 (1), बायजीपुरा गल्ली नं.2 (1), एन ४ विवेकानंद नगर,सिडको (1), शिवाजी नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), गजानन नगर एन ११ हडको (5), भवानी नगर, जुना मोंढा (1), जुना बायजीपुरा (2), किराडपुरा (1), रोशनगेट (1), राशीदपुरा (1), मोतीवाला नगर (1), दौलताबाद (2), वाळूज सिडको (2), राम नगर, कन्नड (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 14 महिला आणि 32 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!