Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ४८ तासात ६५ लाखांची मदत

Spread the love

मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी ६५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० लाख रुपये आणि एका वारसाला नोकरी, तसेच मुंबई पोलीस फाऊंडेशन (एमपीएफ) तर्फे १० लाख रुपये आणि खासगी बँक विमाकवचच्या माध्यमातून ५ लाख रुपये मदत दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात मदतीचे पैसे ४८ तासांच्या आत जमा करण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांनी दिली.

पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी यासंदर्भात  निर्णय घेतल्याच्या वृत्ताला पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि पोलीस अधिकारी प्रणय अशोक यांनी दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील सहाशेहून अधिक कर्मचारी बाधित आहेत. व्यावसायिक संघटना, उद्योजक सेलिब्रिटी आणि बॉलिवूडमधील दिग्गजांकडून देणगीसाठी २०१८ मध्ये एमपीएफची स्थापना केली होती. या ट्रस्टला मिळालेल्या देणगीचा उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान राज्यात वेगवेगळ्या शहरात तब्बल १२ पोलिसांना या रोगामुळे मृत्यू आला आहे. त्यात सर्वाधिक मुंबई शहरातील आठ  पोलीस आहेत तर एक वरिष्ठ अधिकारी आहे पुणे सोलापूर शहर नाशिक ग्रामीण अशा शहरांमध्ये देखील प्रत्येकी एक असे मृत्यू झाले आहेत.  राज्यातील 136 पोलीस अधिकारी यांना या विषाणूची लागण झाली असून यात PSI, API, PI, IPS दर्जाचेही अधिकारी आहे. आतापर्यंत राज्यातील 1192 पोलीस कर्मचारी हे पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्याा ठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर यासंदर्भात काही लक्षणे आढळली तर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी राज्यात वेगवेगळ्या  ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!