#CoronaAurangabadUpdate : ताजी बातमी : जिल्ह्यात 1119 कोरोनाबाधित, 451 कोरोनमुक्त , मृतांची संख्या 39

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 43 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1120 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  गणेश नगर, खंडोबा मंदिर, सातारा गाव (1), न्याय नगर, गल्ली नं. 7 (2), पुंडलिक नगर, गल्ली नं 7 (1), पोलिस कॉलनी (2), लिमयेवाडी, मित्र नगर (1), शरीफ कॉलनी (1), न्याय नगर, गल्ली न.1 (1), रोहिदास नगर, मुकुंदवाडी (3), मराठा गल्ली, उस्मानपुरा (2), कैलास नगर, गल्ली नं.2 (3), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं.5(2), शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बालाजी नगर (2), इंदिरा नगर (1), खडकेश्वर (1), माणिक नगर (1), जयभीम नगर (4), पुंडलिक नगर (4), जिल्हा सामान्य रुग्णालय (1),  संजय नगर (1),  सिटी चौक (1), बालाजी नगर (1), आझम कॉलनी (1), असेफिया कॉलनी (1), रहेमानिया कॉलनी (1), टॉऊन हॉल (1)  आणि फुलंब्री तालुक्यातील बाबरा, भिवसने वस्ती (2), कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये 18 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.

Advertisements

घाटीमध्ये तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज औरंगाबाद शहरातील रेहमानिया कॉलनीतील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा सकाळी साडेपाच वाजता, इंदिरा नगरातील 80 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जयभीम नगरातील 55 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा 19 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तीन मृत्यूंसह घाटीत आजपर्यंत 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 39 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

यशस्वी उपचारानंतर 451 कोरोनामुक्त

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बाधित झालेल्या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेने यशस्वी उपचार केल्यानंतर आज शहराच्या विविध भागातील 50 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) एक, जिल्हा सामान्य रूग्णालय (मिनी घाटी) 16, मनपा कोविड केअर सेंटरमधून 25 आणि दोन खासगी रुग्णालयातून आठ यांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मिनी घाटीतून आज 16 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये रामनगर येथील 12, बेगमपुरा येथील एक, पुंडलिक नगर येथील तीन व दत्त नगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे, असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
एमआयटी कॉलेज बीड बायपास येथून सिल्क मिल कॉलनीतील सहा, एमजीएम कोविड स्पोटर्स येथील कोविड केअर सेंटरमधून राम नगर गल्ली क्रमांक एकमधील आठ, न्याय नगर, गारखेडा गल्ली क्रमांक सात येथील पाच, किल्ले अर्क कोविड केंद्रातून संजय नगर एक, दत्त नगर लेन क्रमांक पाच येथील एक, चंपा चौकातील तीन, बेगमपुरा येथील एक आणि दोन खासगी रुग्णालयातून आठ अशा मनपा कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या 33 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचारानंतर त्यांना आज सुटी देण्यात आलेली आहे, असे मनपा प्रशासनाने कळवले.
घाटीत इंदिरा नगरातील 28 वर्षीय कोरोनाबाधित महिलेची यशस्वीरित्या सुलभ प्रसूती करण्यात आली होती. त्या महिलेने 2.8 किलो वजनाच्या मुलीस जन्म दिला. या दोघींची प्रकृती उत्तम आहे. प्रसूत महिलेवर यशस्वी उपचारानंतर मार्गदर्शक नियमानुसार त्यांना आज सुटी देण्यात आली. आतापर्यंत घाटी रुग्णालयातून 27 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलेले आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!