Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : औरंगाबाद ग्रामीण रेड झोन मधून मुक्त , तरीही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम 144 लागू

Spread the love
भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांचे इतर लोकांनी संपर्कात येऊ नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे, इ. बाबींमुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये औरंगाबाद जिल्हयात (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) दिनांक 31 मे 2020 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यत जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहेत.

राज्याचे मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार औरंगाबाद महानगरपालिकेचा समावेश “Red Zone” मध्ये करण्यात आला आहे व उर्वरित जिल्हयाचा समावेश “Non Red Zone” मध्ये करण्यात आलेला आहे.

सदरील आदेशानुसार दिनांक 22 मे पासून पुढील नियमावली व उपाययोजना लागू करण्यात येत आहे.
1. मनाई आदेशा दरम्यान दिनांक 31 मे 2020 पर्यत प्रतिबंधीत असलेल्या बाबी (सर्व जिल्ह्यासाठी)
i. सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक – वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बुलन्स, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील.
ii. सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
iii. सर्व प्रकारचे हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर सर्व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र आरोग्य/पोलीस/शासकीय अधिकारी/आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालु राहतील. तसेच बस डेपो, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावरील उपहारगृहे चालू राहतील. घरपोच सेवा देण्यासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
iv. सर्व सिनेमा गृहे, मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स, व्यायाम शाळा, क्रिडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.
v. सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने.
vi. सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.
2. रात्रीची संचारबंदी
अत्यावश्यक बाबी वगळता रात्री 7.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यत नागरिकांची हालचाल/आवागमण पुर्णपणे प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
3. 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक, यापूर्वी इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाच्या खालील बालके, वैद्यकीय बाबी व अत्यावश्यक बाबी वगळता राष्ट्रीय निर्देशकानुसार घरी राहतील यांची दक्षता घ्यावी.
4. कन्टेनमेंट झोन-
i. सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मागदर्शक तत्वानुसार “Red Zone” व “Non Red Zone” मध्ये महानगरपालिका / जिल्हा प्रशासनाकडुन कन्टेनमेंट झोन निर्धारीत करण्यात येईल.
ii. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद तर जिल्हयाच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी, औरंगाबाद हे कन्टेनमेंट झोनची निश्चिती करतील. कन्टेनमेंट झोन हे रहिवाशी कॉलनी, मोहल्ला, झोपडपटटी, इमारत, इमारतीचा समुह, गल्ली, महानगरपालिका वार्ड, पोलीस स्टेशनची हद्द, खेडेगांव, गांवाचा समूह, ग्रामपंचायत यांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
iii. कन्टेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक क्रिया चालु राहतील. कन्टेनमेंट झोनमध्ये नागरीकांची ये-जा रोखण्यासाठी काटेकोर परिघीय नियंत्रण ठेवण्यात यावे. कन्टेनमेंट झोनमध्ये केवळ वैद्यकीय, आपत्कालीन सेवा आणि जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीच नागरीकांचे आवागमण चालु राहील. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे.
5. Red Zone
i. औरंगाबाद महानगरपालिकेचे संपुर्ण क्षेत्र हे Red Zone मध्ये आहे.
ii. संदर्भ क्रमांक 4 वरील शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोव्हीड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच संदर्भ क्रमांक 10 वरील मा. मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
iii. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.
6. Non Red Zone
या क्षेत्रात वरील मुद्या क्रमांक 1 मध्ये नसलेल्या आणि विवक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना “Non Red Zone” मध्ये खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.
a. अनुज्ञेय असलेल्या कुठल्याही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.
b. क्रिडा संकुले व क्रिडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्यासाठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समुह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरीक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
c. सर्व शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
i. दुचाकी – केवळ चालक
ii. तीनचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
iii. चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
d. सामाजिक अंतर व निर्जतुकीकरणाचे उपायांचा अवलंब करुन जिल्हाअंतर्गत बस वाहतूक जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने करता येईल.
e. सर्व बाजार / दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिकअंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधीत बाजार/दुकाने तात्काळ बंद करावीत.
7. या आदेशामध्ये काही नमूद असले तरी कन्टेमेंट झोनमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे यापुर्वीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे पालन करण्यात येईल.
8. आरोग्य सेतू अॅपचा वापर
i. आरोग्य सेतू संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
ii. कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.
iii. जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांचे आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी सबंधीताना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.
9. मद्य विक्रीस प्रतिबंध
संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात (महानगरपालिका व इतर क्षेत्रात देखील) मद्य विक्री करणाऱ्या सर्व आस्थापना बंद राहतील. त्याचप्रमाणे संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात रेस्टॉरंटमध्ये मद्य सेवन करण्यास मज्जाव राहील.
10. स्थानिक पातळीवर नागरीकांनी स्वतः हून काही आस्थापना/दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अत्यावश्यक गोष्टींची दुकाने,औषधालये व कृषि सेवा संबंधीत दुकाने कोणत्याही परिस्थितीत चालु राहतील.
11. दंडात्मक तरतूदी – उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही
परिशिष्ट -1
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
सार्वजनिक ठिकाणे-
1. सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे.
2. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील. व त्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
3. सार्वजनिक आस्थापना व परिवहनाच्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार सामाजिक अंतर राखले जाईल यांची संबंधीत प्रमुखांनी दक्षता घ्यावी.
4. विवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
5. अंत्यविधी सारख्या प्रसंगी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र 50 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
6. सार्वजनिक ठिकाणी पान, तबाखू, गुटखा, मद्य यांचे सेवन करण्यास मनाई राहील.
7. पान, तंबाखूची दुकाने तसेच मद्य विक्री करणारी दुकाने व रेस्टॉरंट पुर्णपणे बंद राहतील.
8. सर्व दुकांनावर ग्राहकांमध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखणे बंधनकारक राहील. आणि दुकानावर एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी असणार नाही.
9. जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्त घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा.
10. सर्व प्रवेश व निर्गम स्थानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
11. सर्व कामाच्या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळयादरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
12. दोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!