#CoronaVirusUpdate : #Covid19 : India : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारापर्यंत , जाणून घ्या प्रत्येक राज्याची रुग्ण संख्या
दिवसेंदिवस देशात करोना व्हायरसचा कहर वाढतच असून देशातील करोना रुग्णांची संख्या ४९३९१ इतकी झाली आहे. तर गेल्या तीन दिवसांत करोनाचे १० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३९०० नवीन रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. तरीही करोनाच्या रुग्णांची संख्या ही थांबताना दिसत नाहीए. देशात करोनाने आतापर्यंत एकूण १६९४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजारांहून अधिक जण बरे झालेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता १५ हजार ५२५ इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज एकाच दिवशी करोनाचे १२३३ नवीन रुग्ण आढळले आलेत. आतापर्यंत २४ तासांतील रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण हे गुजरातमध्ये आहेत. गुजरातमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ६२४५ इतकी झाली आहे. यानंतर दिल्लीचा क्रमांक येतो. दिल्लीत ५ हजारांहून अधिक करोनाचे रुग्ण आहेत. यानंतर तामिळनाडूत ४ हजारांहून अधिक करोना रुग्ण आहेत.