Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#BreakingNews : मोठी बातमी : विशाखापट्टणम मध्ये वायूगळतीमुळे हाहाकार , ८ जणांचा मृत्यू

Spread the love

अंधार प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे हाहाकार झाला असून या वायू गळतीत  ८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत एकूण ५००० जणांना या गॅस गळतीची बाधा झाली असून शेकडो बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूच्या गळतीमुळे तीन किमीच्या परिसरावर परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेवर विचारविनिमय करण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , आर. आर. वेंकटपुरम येथे असलेल्या विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत ही विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जेथे होते तेथेच कोसळले. एकीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना ही दुर्घटना अचानक घडल्याने सगळीकडे हाहाकार उडाला. या दुर्घटनेत २० लोक गंभीर असून यात बहुतेक जेष्ठ नागरिक आहेत.

काही लोकांना गोपालपुरमच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक लोकांच्या उपचारासाठी रुग्णालयात १५०० ते २००० बेडची व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही. वायूगळतीची माहिती मिळताच विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवले गेले असे चंद यांनी सांगितले. वायू गळतीच्या परिसरात लोकांना न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. एल. जी. पॉलीमर्स इंडस्ट्रीची स्थापना सन १९६१ मध्ये हिंदुस्तान पॉलीमर्स या नावाने झाली. ही कंपनी पॉलिस्टायरेन आणि त्याचे को-पॉलिमर्सची निर्मिती करते. सन १९७८ मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉव्हल अॅण्ड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पोलिमर्सचे विलिनीकरण झाले. त्यानंतर ही कंपनी एल.जी. पॉलिमर्स इंडस्ट्री या नावाने ओळखू लागली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!