Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#BuddhaJayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्ध जयंती निमीत्ताने बोलताना काय म्हणाले ?

Spread the love

बुद्धपौर्णिमेनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधनन केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या यासोबतच आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाचं कौतुक केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात होणाऱ्या पूजा आणि समारंभांचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहेत त्यामुळे लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या पाहता येणार आहे. वेळ, काळ आणि स्थिती बदलली तरीही गौतम बुद्धांनी दिलेला संदेश कायम प्रवाही आहे. संघटनात्मक भावनेतून आपण या महासंकटावर मात करू शकतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. गौतम बुद्धांचे संदेश आणि त्यांची शिकवणीचं महत्त्व पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.

या निमित्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि , कोरोनाच्या महासंकटात अनेक लोक 24 तास सेवा देत आहेत. जेवढं शक्य आहे तेवढा मदतीचा हात पुढे करायला हवा. जगभरात ज्या देशांना  भारताची गरज पडली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलं. आपलं काम निरंतर सेवा भावनेतून असावं ही भावाना कायम आपल्या मनात ठेवायला हवी. सगळ्यांना मदत करण्यासाठी भारत कायम तयार आहे. बुद्ध मानवतेचं दर्शन करतात. कोरोनाच्या महासंकटा सापडलेल्या व्यक्तींच्या पाठिशी आपण उभे आहोत असा मला विश्वास आहे. शक्य असेल तेवढी मदत करा. मदतीचा हात पुढे करा. जगात विसकीत देश असलेला भारत हा सर्वांच्या मदतीसाठी कायम तत्पर असेल. या कठीण काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्हाला खऱ्या अर्थान सलाम. माणसाला नेहमी मदत करणारे खरे भगवान गौतम बुद्धांचे खरे शिष्य आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!