Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : एका मित्राला एका मित्राच्या ऑफिसने अनफॉलो केले त्याची गोष्ट ….

Spread the love

देशात कोरोनाची चर्चा जोरावर असताना आणखी एक बातमी सोशल मीडियावर चर्चेला आली . हि बातमी आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाउसने ट्विटरवर अनफॉलो केल्याची. त्याचे कारण ट्रम्प आणि मोदी ऑन कॅमेरा कायम एकमेकांचे मित्र असल्याचे सांगत आल्याने मोदींना ट्रम्प म्हणजे खूपच जवळचे मित्र  वाटतात . हाऊडी मोदी चे उत्तर नमस्ते ट्रम्प ने देऊन मोदींनी फिट्टमफाट केली . पुढे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाउसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे.

दरम्यान व्हाइट हाउसने अचानकपणे अनफॉलो का केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाउसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाउस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. याआधी व्हाइट हाउसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान मोदींनी फॉलो करण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मात्र, अचानकपणे ट्विटरवर व्हाइट हाउसने पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!