Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : पाण्याच्या टँकरने बालकाला चिरडले, सिल्लेखान्यात सकाळी घडली घटना

Spread the love

चिंचोळ्या गल्लीत पाण्याचे टँकर वळविताना पाठीमागील चाकाखाली सापडल्याने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सिल्लेखाना परिसरातील महिला भरोसा केंद्र असलेल्या गल्लीजवळ घडला. अफान आरेफ कुरेशी (७, रा. सिल्लेखाना) असे मृत बालकाचे नाव आहे.या प्रकरणी टॅंकरचालक बाळू भूजंग बेरचे(२४) याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे.
सिल्लेखान्यातील चिंचोळ्या गल्लीत आज सकाळी खाजगी पाण्याचे टँकर (एमएच-१९-एक्स-१०७१) घेऊन चालक बाळु भुजंग बेरचे गेला होता. या अरुंद गल्लीतून पाण्याचे टँकर वळविताना अफान हा त्याच्या आजोबांसोबत खेळत होता. टँकर वळण घेताना अफान घाबरुन व तोल गेल्याने ओट्यावरुन खाली पडला. तेवढ्यात वळण घेत असलेल्या टँकरच्या पाठीमागील चाक त्याच्या पोटावरुन गेले. यावेळी नागरिक ओरडले. पण गोंधळून गेलेल्या चालक बेरचेच्या टँकरखाली अफान सापडला. या अपघातानंतर बेरचे तेथेच थांबून राहिला. अफानला नागरिकांनी तात्काळ घाटीत नेले. पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. अफानचे वडील आरेफ कुरेशी हे व्यापारी आहेत. अफानला आणखी एक थोरला भाऊ असल्याचे उपनिरीक्षक राऊत यांनी सांगितले. या घटनेमुळे सिल्लेखाना परिसरात शोककळा पसरली आहे.

हर्सुलमध्ये युवकास तिघांनी बदडले
सुरत देखकर अनाज वाटप करता है असे म्हणत तीन जणांनी सद्दाम शहा शाहीद शहा (वय २६, रा.अंबरहिल, जटवाडा रोड) या युवकास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली. अजय, अक्षय, नवनाथ, सर्व रा.देहाडेनगर, हर्सुल यांनी ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सद्दाम शहा यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शेख जहीर करीत आहेत.

संचारबंदीचे उल्लंघन करणा-या १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल
संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणा-या १२ जणांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सिडको-१, सिटीचौक-२, पुंडलिकनगर-१,हर्सुल-२,बेगमपुरा-१ असे एवूâण ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संचारबंदीत मासे विक्री करणा-या दोघांविरूध्द गुन्हा दाखल
औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीे आदेशाचे उल्लंघन करून रिक्षात बसून मासे विक्री करणाNया दोन जणांविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख इम्रान शेख इसा (वय २४, रा.माणिकनगर), शेख आबेद शेख सांडू (वय ३६, रा.अजीज कॉलनी, नारेगाव) हे दोघे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळासमोरील सार्वजनिक रोडवर रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएफ-३३३७) मध्ये बसून मासे विक्री करीत होते. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार कोलते करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!