Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : घाटीतून कैद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न

Spread the love

औरंंंगाबाद : घाटी रूग्णालयात आजारपणामुळे दाखल असलेल्या कैद्याने  कारागृह पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घाटीतील वॉर्ड क्रमांक १८ येथे घडली. त्याचे असे झाले कि , चरणसिंग प्रेमसिंग सुलावणे (रा.हर्सुल कारागृह) हा कैदी  आजारी असल्याने त्याला घाटीतील वॉर्ड क्रमांक १८ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर चरणसिंग सुलावणे याची प्रकृती ठिक झाल्याने सोमवारी त्याला घाटीतून डिस्जार्ज देण्यात आला होता. हर्सुल कारागृहाचे पोलिस कर्मचारी गणेश जवादे (वय ३१) हे आपल्या सहकार्यांसह चरणसिंग सुलावणे याला परत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुलावणे याने जवादे यांच्यासोबत असलेल्या पथकावर हल्ला करून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार भारत कोकणी करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!