Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्ली अधिकच भडकली , हिंसाचारात १३ ठार ,१५० हुन जखमी

Spread the love

सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरून सलग तिसऱ्या दिवशीही दिल्लीत हिंसाचार सुरूच असून  या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. तर जवळपास १५० जण जखमी झालेत. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिलीय. दरम्यान, या प्रकरणी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत लष्कराचा पाचरण करण्याची मागणी करण्यात आली. पण गृहमंत्रालयाने याला नकार दिला. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत असून अमित शहा यांनी दिल्लीकर जनतेला शांततेचे  आवाहन केले आहे. दरम्यान, दिल्लीतील यमुना विहारमध्ये दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेत, असं वृत्त ‘टाइम्स नाउ’ वाहिनीने दिले आहे. मात्र पोलिसांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.दरम्यान, हिंसाचारग्रस्त भागातील शाळा, कॉलेजेस उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच  उद्या होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येत असल्याचे दिल्लीचे  उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.


एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह १३ जण ठार झाले असून  ५६ पोलिस आणि १३० नागरिक जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली आहे . नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी सतत गस्त घालत आहेत. आजही काही भागात हिंसक घटना घडल्या, असं रंधवा म्हणाले. तर हिसांचारात १३ जण ठार झाल्याची माहिती गुरू तेग बहादूर हॉस्पिटलने दिलीय.  हे वृत्त दिलंय.

दरम्यान तणावग्रस्त भागात ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात येत आहे. तसंच हिंसाचार झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हिंसेच्या घटनेनंतर भजनपुरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीय. तर खजुरीखासमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आला आहे. चांदबागमध्ये संध्याकाळी जाळपोळ करण्यात आली. काही दुकानं पेटवण्यात आली. एक बेकरीचे दुकान आणि फळांचे दुकान पेटवण्यात आले. तसंच दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पण त्याला यश न आल्यानं अखेर निम लष्करी दलाच्या तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

दिल्लीमध्ये सीएए आणि एनआरसीच्या  विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले असून सलग दुसऱ्या दिवशीही  हिसांचार सुरुच आहे. ईशान्य दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत अनेक लोक जखमी झाले आहेत. वाढत्या हिंसाचाराला आटोक्यात आणण्यासाठी सध्या पोलिसांनी दिल्लीत कलम १४४ लागू केले असून  हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरासाठी जमावबंदी लागू केली आहे. जाफराबाद आणि मौजपुरमध्ये सोमवारी सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये हिंसाचार उसळला होता. दिल्लीत आजही तणाव कायम आहे.

दिल्लीतील मौजपूर भागामध्ये अद्याप तणावाचे वातावरण आहे. या परिसरात बऱ्याच प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला. तसंच पत्रकारांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओ डिलिट करायला लावल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे. दिल्लीत दुपारच्या सुमारास दगडफेकही झाली. यावेळी जमावाने दोन पत्रकारांसोबत धक्काबुक्की केली. यात सीएनएन न्यूज १८ च्या एका महिला पत्रकाराचा समावेश आहे. यात जखमी झालेल्या महिला पत्रकारावर सध्या उपचार सुरू आहेत. चांदबाग भागात जाळपोळीची घटना, चांदबाग, करावल नगर, मौजपूर आणि जाफराबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील स्थिती नियंत्रणात असून आतापर्यंत ११ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्लीत हिंसा सुरूच, गोकुलपुरी आणि वेलकम पोलीस ठाण्याच्या परिसरात हिंसा, बाबरपूर रोडवर गाड्या पेटवल्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी खजुरीखास भागात पोलिसांचे संचलन करण्यात येत आहे.

जाळपोळीच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या असून आग नियंत्रणासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबावरही दगडफेक झाली. जाफराबाद आणि मौजपूर भागात हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माध्यमांना माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक होती आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. केजरीवाल म्हणाले की, या हिंसाचाराने कोणाचाही फायदा होणार नाही. सर्व पक्षांनी राजकारणापलिकडं या घटनेकडं बघायला हवं. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्व पक्ष मिळून दिल्ली पुन्हा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करू. तरीही आंदोलनकर्त्यांनी आंदोलन थांबवले तर नाहीच उलट अधिक चिघळले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!