Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bihar : मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत एनआरसीच्या विरोधात प्रस्ताव मंजूर , मोदी त्यांना मोठा धक्का

Spread the love

बिहारचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी आपल्या राज्यात एनआरसी लागू न करण्याचा प्रस्ताव विधानसभेत पारित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का दिला आहे. याशिवाय एन.आर.सी. लागू करण्याची काहीही गरज नसल्याचंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. दरम्यान  एनपीआरच्या विवरणपत्रातील वादग्रस्त कलमं हटवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.  नितीश कुमार आणि जनता दल युनायटेड  हा केंद्रातल्या आघाडीतला सहकारी पक्ष मानला जातो. एन.आर.सी लागू न करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाचं लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि विधानसभेतले विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांचं अभिनंदन केलं आहे. या संदर्भातला मुख्य प्रस्ताव विरोधकांनीच मांडला होता.

सरकारने विरोधाचा प्रस्ताव आणल्यामुळे सभागृहात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांनी मात्र केंद्राचा हा कायदा ‘काळा कायदा’ असल्याची टीका करत सरकारच्या एन.आर.सी. लागू न करण्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. सरकारने हा प्रस्ताव आणत असल्याची सभागृहात घोषणा करताच भाजप आणि जद च्या सदस्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध झालं. मला माझ्या आईचा जन्म कधी आणि कुठे झाला हे माहीत नसल्याचं मुख्यमंत्रि नितीश कुमार यांनी म्हटलं आणि सभागृहातल्या गोंधळात भर पडली.

हा ठराव पस होताच सरकारला आमच्या मागणीपुढे  गुडघे  टेकावे लागले असा दावा विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. दरम्यान एन.आर.सी. आणि एन.पी.आर. च्या विरोधात सभागृहात प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांच्या रणनितीला नितीशकुमारच्या सरकारने कोणताही विरोध केला नाही, हे विशेष. याच वर्षी ऑक्टोबर २०२० मध्ये बिहार विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यातल्या मतांची आकडेवारी पाहता ओबीसी मतं (४५ टक्के), महादलित (१५ टक्के), मुस्लीम मतं जवळजवळ १७ टक्के आहेत. मागच्यावेळी भाजपचं समर्थन मिळाल्यामुलेत नितीशकुमार यांना सत्ता स्थापन करता आली होती. सध्याचं देशातलं भाजप, मोदी-शहा आणि एन.आर.सी. च्या विरोधातला अल्पसंख्याक समाजातला रोष पाहता नितीश कुमार यांनी हि भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!