Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एकाच मुलीवर “त्यांचे ” प्रेम होते , एकाने दुसऱ्याचा खून करून स्वतःही केली आत्महत्या

Spread the love

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरात एकाच मुलीवर जीव जडलेल्या दोघांना आपला जीव गमावण्याची वेळ आली. विशेष म्हणजे हे  दोघेही एकाच शाळेत शिक्षक होते. हे प्रकरण असे आहे की , एकाच शाळेत शिकवणारे दोन शिक्षक एकाच मुलीच्या प्रेमात पडले. सुरुवातीला दोघांनी  एकमेकांना समजवलं नंतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना समजवलं पण दोघेही काही ऐकण्यासाठी तयार नव्हते. शेवटी दोघांचाही अंत झाला.

दरम्यान या प्रेमप्रकरणातून दोघांनेही प्रेमात माघार घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्यादेखील केली. धक्कादायक म्हणजे हत्येच्या काही वेळानंतरच आरोपीने स्वत:देखील आत्महत्या केली. शिक्षक सूरज पांडेचा मृतदेह जिल्ह्यातील विंध्याचल पोलीस स्टेशन परिसरातील रपुरी गावात विहिरीत आढळला. पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाचा खुलासा केला. पोलीस लाइनमध्ये ही घटना उघडकीस आणताना पोलिसांनी सांगितले की, सूरजची त्याच्याबरोबर एकाच शाळेत शिकवत असलेल्या दोन सहकारी शिक्षकांनी गळा आवळून खून केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सूरज, अनुज आणि रत्नेश हे कुरैठी येथील एचपी तिवारी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक होते. सूरज आणि अनुजची चांगली मैत्री होती.

प्रेम प्रकरणातून अनुजने सुरज सांगितलेले ऐकत नाही म्हणून आपला साथीदार रत्नेश यांच्यासह ११ फेब्रुवारीला मफलरने सूरजचा गळा आवळून खून केला होता. अनुजचे तीन वर्षांपासून एका मुलीवर प्रेम होते. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून सूरज त्याच मुलीशी फोनवर बोलू लागला. अनुजला हे कळताच त्याने सूरज न बोलण्याची ताकीद दिली. परंतु सूरज ऐकत  नाही म्हणून ११ फेब्रुवारी रोजी अनुजने आपल्या साथीदार रत्नेशसह सूरजची मफलरने गळा आवळून हत्या केली.

अनुजने हत्येनंतर सूरजचा मृतदेह विहिरीत फेकला. यानंतर सूरजची दुचाकी घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर फेकली. पोलिसांनी त्याचा मित्र रत्नेशला  या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती, सूरजच्या हत्येनंतर अनुजनेही १३ फेब्रुवारीला फाशी घेऊन आत्महत्या केली. प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी हत्येत सहभागी असलेल्या रत्नेश या साथीदाराला अटक केली आणि सूरजची दुचाकीही जप्त केली. पोलिसांनी रत्नेशला तुरूंगात पाठविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!