Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गंगाखेडला मोबाईल शाॅपी फोडणारे, तीन चोरटे मुद्देमालासह ग्रामीण गुन्हेशाखेच्या जाळ्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद- परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील मोबाईल शाॅपी फोडून तीन चोरटे जालना भोकरदन सिल्लोडहून मालेगावला जात असतांना गुन्हेशाखेच्या सूचनेवरुन सिल्लोड शहर पोलिसांनी भोकरदन नाक्यावर नाकाबंदी करुन तीनही चोरट्यांना मुद्देमालासहित पकडून गुन्हैशाखेच्या हवाली केले.
अकबरखान हमीदखान(३०)व सय्यद हुसेन सय्यद हबीब दोघेही रा. मालेगाव,अफसरखान हबीबखान(२६) परभणी,अशी अटक आरोपींची नावे आहेत.त्यांच्या ताब्यातून एक महिंद्रा जीप, ६३विविध कंपन्यांचे मोबाईल हॅंडसेट,एक लॅपटाॅप आणि रोख रक्कम असा २५लाख ५०हजार १६६रु.चा मुद्देमाल जप्त केला.वरील तीन्ही चोरटे रेकाॅर्डवरचे आहेत.आणखी बरेच गुन्हेत्यांच्याकडून उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली वरील कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुलंत,सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पीएसआय बालाजी ढगारे पोलिस कर्मचारी पंडीत फुले, संजय आगे यांनी भाग घेतला होता.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!