Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशातील आर्थिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच सीएए आणि एनआरसी , प्रकाश आंबेडकर यांची मोदी सरकारवर टीका

Spread the love

देशातील आर्थिक मुद्द्यांकडे  दुर्लक्ष करण्यासाठीच  नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी माध्यमातून देशात अराजक माजवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे. सीएए हा आरएसएसचा डाव आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान आणि आरएसएसवर शरसंधान साधले. सीएए हा कायदा १०० टक्के मुस्लिम विरोधात आहे. त्याचसोबत ४० टक्के हिंदु विरोधी आहे, असे सांगत हिंमत असेल तर अटक करून दाखवा, असे थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला दिले. “भाजपाकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

दादरच्या खोदादाद सर्कल येथे सीएए विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो  कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , पीएम तुम्ही खोटारडेपणा  शिवाय काहीच नाही हे सिद्ध करीत आहात. गृहमंत्री अमित शहा कायदा लागू करू, असे विधान पंतप्रधानांना न विचारता करतात का? जर तसे  केले असेल तर शहा यांचा राजीनामा घेणार की त्यांच्याकडून गृहखाते काढणार? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांना यावेळी केला.

आपल्या भाषणात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी आपली भूमिका मांडताना ते पुढे म्हणाले कि , भटका विमुक्त हा किती वर्षे डिटेशन्स कॅम्पमध्ये आहे हे माहिती आहे का? काही जमातीना गुन्हेगार ठरवले त्यावेळेस त्यांना डिटेशन्स कॅम्प यात ठेवले गेले होते. महाराष्ट्रात आज ही अनेकजण रस्त्यावर संसार करतात, त्याच्या पिढी डिटेशन्स कॅम्पमध्ये गेली. हा खेळखंडोबा जाणिवपूर्वक सुरू विचारपूर्वक सुरू आहे. काँग्रेस एनसीपी नेतृत्त्व यांना भटका समाज या आधी दिसला नाही. त्यांनी सांगितले असते की हा कायदा हिंदु विरोधात हे सांगितले नाही. ते मुस्लिम समाजाचे मुद्दे मांडत राहिले.  जर या कॅम्प जायचे नसेल तर सरकारला वाजवले पाहिजे. आर्थिक मुद्दे दुर्लक्ष करण्यासाठी मोदी हे सगळे करत आहेत.

वंचित बहुजन आघाडी सीएए कायदा विरोधासह अर्थव्यवस्था मुद्दावरून लढणार असल्याचे सांगून ते म्हणाले कि , ज्यांना डिटेशन्स कॅम्पात जायचे नाही, त्यांनी या सरकारला झोपवण्याची तयारी ठेवा, आंदोलन करण्याची तयारी ठेवा, अन्यथा डिटेशन्स कॅम्पात जायची तयारी करा.  मुंबईत लोकांना डिटेशन्स कॅम्प दोन ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी खारघर डिटेशन्स कॅम्पमध्ये दोन लाख लोक राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  परदेशी नियमबाह्य भारतात लोक किती सरकारने हे जाहीर करण्याची गरज आहे . आणि इतके मोठे खारघर डिटेशन्स सेंटर कोणासाठी ? उभारण्यात येत आहे याचाही खुलासा सरकारने करण्याची गरज आहे.

सरकारच्या विरोधात जे बोंब करतात त्यांची जागा डिटेशन्स कॅम्प निश्चित आहे म्हणूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जागांवर डिटेशन्स कॅम्प बांधून ही ठेवले असल्याचा आरोप करून आंबेडकर म्हणाले कि , एनआरसी, सीएए विरोधात जे लढतील त्यांना आमचा पाठिंबा,पण लक्षात ठेवा काहीजण तीन दगडावर वेगवेगळी भूमिका घेतात, काहीजण शकुनीमामा भूमिका घेतात,  हे सगळे मुद्दे असताना सावरकर यांचा मुद्दा का काढावा ? असा सवाल  करताना त्यांनी काँग्रेस राहुल गांधी यावर नाव न घेता टीकाकेली.  एनआरसी हा मुस्लिम विरोधात आहे असा भास मुद्दा केला जातो. कारण हिंदु-मुस्लिम दंगा करायचा पण आपण हे सांगतो की हा कायदा हिंदु विरोधात ही आहे. कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले कि , आंदोलन करताना गैरकृत्य होणार नाही, गालबोट लावू नका.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!