Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहतो म्हणून लहान भावाने दिली मोठ्या भावाला हि धक्कादायक शिक्षा….

Advertisements
Advertisements
Spread the love

देशात सर्वत्र स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना तसेच हैदराबादेतीळ सामूहिक बलात्कार आणि  खून प्रकरणातील आरोपींना  पोलिसांनी चकमकीत ठार केल्याची घटना समोर असतानाच स्त्रियांकडे वाईट नजरेने  पाहणाऱ्या मोठ्या भावाचा काटा लहान भावानेच  काढल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी लहान भावासह चौघांना अटक केली आहे.

Advertisements

या विषयी पोलिसांनी सांगितले कि , वाशीम जिल्ह्याच्या आसेगाव पेनच्या पैनगंगा नदीमध्ये पुलाखाली ६ डिसेंबर रोजी मोटारसायकल ला बांधलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची अतिशय निर्दयीपणे हत्या  करून त्याचा मृतदेह नदी पात्रात फेकून दिला होता. मृतक धोडप गावातील संदीप बकाल हा असल्याचे  तपासात उघड झाले होते. दरम्यान संदीप बकाल हा २७ नोव्हेंबरपासून घरून बेपत्ता होता. तो त्या दिवशी रिठदला आला होता. मात्र, संध्याकाळी त्याचा मोबाईल बंद येत असल्याने  तशी तक्रार रिसोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.

Advertisements
Advertisements

मृतावस्थेत सापडलेल्या संदीप बकाल या २८ वर्षीय तरुणाच्या खुनाचे  कारण आणि त्याचे खुनी शोधण्याचे  मोठे   आव्हान पोलिसांसमोर असताना पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. पवनकुमार बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी ठाकरे आणि रिसोड पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या पथकाने बारकाईने तपास केला असता पोलीस जेंव्हा खुन्यांपर्यंत पोहोचले तेंव्हा हे धक्कादायक वास्तव समोर आले.

पोलिसांच्या तपासात संदीपचा खून त्याच्याच लहान भावाने मावस भाऊ आणि इतर दोघांच्या साहाय्यानं केल्याचे  निष्पन्न झाले. संदीप बकाल याच्याकडे कायम मोठी रक्कम असायची तसेच तो नेहमी कोणत्याही स्त्रीवर वाईट नजर ठेवत असे. त्याला त्यामध्ये नातेही समजत नसल्याने  त्रस्त झालेल्या त्याच्या सख्ख्या लहान भावानेच इतरांच्या मदतीने आपल्या मोठ्या भावाला आयुष्यातून संपवले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!