Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : वेदांतनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, गड्डी गॅंग उल्हासनगरातून आणले.

Spread the love

औरंगाबाद – गेल्या आॅगस्ट ते आॅक्टोबर महिन्यात औरंगाबादेत २४ हजार रु. एटीएम कार्डची अदलाबदल करुन लंपास करणारी गड्डी गॅंग वेदांतनगर पोलिसांनी उल्हासनगर पोलिसांकडून ट्रान्सफर करुन अटक केली.व कोर्टासमोर हजर करुन दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवली. या प्रकरणी नौव्हेंबर मधे वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून परवैज अकबरअली शेख(२८) प्रविण साहेबराव पाटील (३०) किरण कचरु कोकणे (३२) सर्व रा. म्हारळगाव ता.कल्याण जि. ठाणे अशी अटक आरोपींची नावे आहेत.या आरोपींसोबत आणखी सहा ते सात जण असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.राज्यभर या गॅंगने धुमाकुळ घालंत लोकांच्या लाखो रुपयांचा चुराडा केल्याचे पोलिसांनी सांगितले.

१४नोव्हेंबर२०१९रोजी अलाना बुकब्रॅंड फॅक्टरी जवळ राहणार्‍या सिराज बुढन शैख(४२) यांना उत्तर प्रदेशात गावी पैसे  पाठवायचे होते. त्यामुळे मित्रासोबत ते रेल्वेस्टेशन रोडवरील एस.बी.आय. बॅंकेच्या एटीएम वर पैशे काढण्यासाठी आले. पण पैशे निघंत नसल्यामुळै सिराज बुढन हैरान झाले हौते. त्याच वेळैस एटीएम जवळ दबा धरुन बसलेल्या वरील आरोपींनी सिराज जवळील एटीएम घेऊन १०हजार रु. काढून दिले. पण पुन्हा पैशै निघंत नसल्याचे कारण सांगून आरोपींनी स्वता:जवळचे एटीएम. सिराज यांना देऊन परत पाठवले.कारण पैशे काढत असतांना वरील चोरट्यांनी सिराज एटीएम बदलले व सिराज त्या ठिकाणाहून घरी परतंत असतांना त्यांच्या खात्यातून २४हजार रु. वजा झाल्याचा मेसैज सिराज यांच्या मोबाईल वर आला. या नंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भदरगे यांनी आरोपींनी गुन्हा केलेल्या घटनास्थळावरील सी.सी. टि.व्ही. फुटेज तपासले. त्यामधे आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत हौते. म्हणून पोलिस निरीक्षक रोडगे यांनी सी.सी.टि.व्ही. फुटेज मधील आरोपींचे फोटो खबर्‍यांनाहि पाठवले होते. दरम्यान सिराज यांच्या जवळील आरोपींनी दिलेले एटीएम ठाणे जिल्ह्यातील म्हारळगाव येथील असल्याचे कळले.म्हणून पोलिस निरीक्षक रोडगे यांनी ठाणे पोलिसांकडे वरील आरोपींबाबत चौकशी केली असता वरील आरोपी उल्हासनगर पोलिसांनी अटक केलेले आढळले.

आरोपींची मोडस आॅपरेंडी

एटीएम सेंटरमधे पैशे काढणार्‍या लोकांना पैशे काढून देण्यास मदत करण्याचा बहाणा करंत त्यांचा पासवर्ड लक्षात ठेवून एटीएम ची अदलाबदल करणे.व लंपास केलेल्या एटीएम कार्डवरुन शाॅपिंग करणे किंवा पैशे काढणे. तसैच बॅंकेत पैशे भरण्यास उभ्या असलेल्या लोकांना आरोपींच्या रुमालात पैशांची गड्डी असल्याचे भासवून ते त्यांना गावी पैशे पाठवायचे आहे अशी थाप मारंत त्यानंतर मदत मागण्याच्या बहाण्याने बॅंकेतील मदत करणार्‍याची रौख रक्कम लंपास करंत व नोटांच्या आकाराचे कागदाचे तुकडे असलेली गड्डी मदत करणार्‍याच्या हवाली करंत राज्यभरात जानेवारी१९पासूनते नोव्हेंबर पर्यंत पुणे जिल्ह्यातील चाकण, मावळ,तसेच खोपोली, पनवेल ,लोणावळा ,खंडाळा,वाई, सातारा, सांगली, कर्‍हाड, कोल्हापूर, गोवा, खालापूर, खडकी, हवेली,पिंपरी चिंचवड, संगमनेर, नाशिक, कोपरगाव ,राहता, शिर्डी, अहमदनगर, शहापूर, इगतपुरी, वणी, निफाड,धुळे, जळगाव, अंमळनेर, चोपडा,यवतमाळ,बुलढाणा,जालना व औरंगाबाद तर मध्यप्रदेशातील इंदोर, झाशी,त्याचप्रमाणे उत्तरप्रदेश बिहार मधेही आरोपींनी गुन्हे केल्याचे पोलिस तपासात उघंड झालेले आहे.

वरील कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भदरगे, किशोर बनसोडे, अतुल साळुंकेंनी कामगिरी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!