Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिखर बँक घोटाळा : शरद पवारांना ईडीच्या चौकशी आधीच अण्णा हजारेंनी दिली क्लीन चिट

Spread the love

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा ईडीचा विषय  ज्यांच्या नावाने गाजत आहे त्या अण्णा हजारे यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली असून त्यात त्यांनी शरद पवार यांना जणू एक प्रकारे क्लीन चिटच दिली आहे. या संदर्भात त्यांनी म्हटले आहे कि , राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे.

अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे या विषयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. माझ्याकडं शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे . जे सत्य आहे ते सत्यच, खोटे आरोप करणे चुकीचे आहे, असंही हजारे म्हणाले.

‘माझ्याकडं आलेल्या पुराव्यानुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. परंतु अजित पवार यांचे या प्रकरणात नाव आहे. ईडीनं शरद पवार यांचं नाव कसं काय घेतलं याची चौकशी पुढे येईल. सहकारी कारखान्यासाठी  बँकेतून करोडो रुपयांचे कर्ज घेतले गेले. मात्र त्यानंतर कारखान्यांनी बँकांना पैसे परत दिले नाही. त्यामुळं बँकांनी कारखान्यांवर जप्ती आणली व बँकेनं कवडीमोल भावानं ते कारखाने विकले. यातच मला शंका आहे की कारखाने आजारी पडले की पाडले गेले.

दरम्यान सीआयडीचे अधिकारी जय जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी न करता दोन ओळीत या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचं सांगितले होतं. त्यामुळं मला या प्रकरणात अधिका-यांचे देखील हात असल्याची शंका येत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार आहे’ असं अण्णांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!