Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ह्रदयद्रावक : १२ वर्षाच्या बालिकेवर दोन वर्षांपासून केला जात होता लैंगिक अत्याचार आणि तिला जाणीवही नव्हती , अत्याचाराची व्यथा ऐकून पोलिसही झाले सुन्न !!

Spread the love

केरळच्या मल्लुरमध्ये १२ वर्षाच्या बालिकेवर  तिच्या कुटुंबियांच्या आर्थिक असहाय्यतेचा फायदा घेऊन गेल्या दोन वर्षांपासून ३० वर्षाहून अधिक वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे दुष्कृत्य उघडकीस आले असून या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा, भारतीय दंड विधान कलम २५४ आणि ३७६, तसेच बाल न्याय आणि संरक्षण अधिनियमांअतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला लैंगिक अत्याचार म्हणतात याची या निरागस बालिकेला कोणतीही माहिती नव्हती , यामुळे समुपदेशक आणि पोलिसही सुन्न झाले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कृत्यात आपले वडीलही सहभागी असल्याने त्यांना अटक झाली तर आपले गरीब कुटुंब रस्त्यावर येईल याची पुरेपूर समज आलेल्या या चिमुकलीने आपल्या घराच्या दरवाजावर आणि भिंतीवर पिडीत मुलीने ” सॉरी मम्मा ” असे लिहून आईची  माफी मागितली.

वास्तविक पाहता आपल्या मुलीचे लैंगिक शोषण होत आहे याची पूर्ण कल्पना तिच्या आई-वडिलांनाही  होती मात्र ते  शांत होते.  तर आपल्या वडिलांना शिक्षा मिळावी असे या चिमुकलीला वाटत नव्हते. वडील जर तुरुंगात गेले, तर आपल्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळेल ही भीती तिला सतत सतावत होती.

पीडित बालिका  १० वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीने जेव्हा समुपदेशन सत्रात आपले भीतीदायक अनुभव ऐकवले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिची शाळा तिच्या भाड्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर आहे. मुलीचे दु:ख ऐकून काउंसिलरनाही धक्का बसला. इतके सगळे होऊन देखील आपण आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या कोणतीही मदत करू शकत नाही याची या मुलीला खंत होती.

तुझ्या घरात कसं काय सुरू आहे, असा प्रश्न मुलीला विचारल्यानंतर तिला रडू कोसळ्याचे समुपदेशकांनी सांगितले. आपल्या घरात आजारी आजी आहे. घरची आर्थिक स्थिती अत्यंत नाजुक आहे, इतकी की घराचे भाडे देखील देणे कठीण आहे, अशी माहिती या पीडित मुलीने समुपदेशकांना दिली. आपले लैंगिक शोषण होत आहे, याची या मुलीला कल्पनाच नव्हती असे समुपदेशक सांगतात.

पोलिसांच्या माहितीनुसार सर्वात पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या मित्रानेच आपल्यावर बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. ही व्यक्ती तिच्या कुटुंबाला पैसे पुरवत होता. पुढे इतर लोकही या लैंगिक शोषणात सहभागी झाले. यात आणखी एक तिसरी व्यक्ती होती. ती व्यक्ती पैसे वसूल करण्याचे काम करत असत. या व्यक्तीला मात्र पीडित मुलगी कधीही भेटली नसल्याचे ती सांगते. मुलीचे वडील बेरोजगार असून त्याने तिच्या आईलाही देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले आहे.

या प्रकरणी एका दंडाधिकाऱ्यासमोरच या मुलीचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती तिरुरंगदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नौशाद इब्राहिम यांनी सांगितले. तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणी रविवारी रात्री पीडित मुलीच्या वडिलांसह  तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर संबंधित लोकांचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!