Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : जमिनीच्या वादातून १० जणांची हत्या , १४ जण जखमी

Spread the love

उत्तर प्रदेशातली सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून  १० जणांची हत्या झाली असून १४ जण जखमी झाले आहेत. ही खळबळजनक घटना सपाही गावात घडली आहे. १०० एकर जमिनीवरून दोन गटांत वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत आणि नंतर गोळीबारात झालं. बंदुकीशिवाय अन्य हत्यारांचाही वापर झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेक जण गंभीर आहेत. मृतांमध्ये तीन  महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. दोन गंभीर जखमी आहेत . जिल्हाधिकारी अंकित कुमार म्हणाले, ‘नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनेक जण जखमी आहेत तर अनेकांचा बळी गेलाय. नेमकी संख्या आता सांगता येणार नाही.’

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी या जमिनीच्या खरेदीचा व्यवहार झाला होता. सपाही गावचा प्रधान यज्ञ दत्त खरेदी केलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी गेला तेव्हा स्थानिकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर हा वाद उफाळला आणि त्याने त्याच्या लोकांनी गोळीबार केला. दत्त याच्या दोन पुतण्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालकांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!