Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गोपनीयता आणि देटा गैरवापर , फेसबुकला ३५ हजार कोटींचा दंड

Spread the love

फेसबुकला आतापर्यंतचा सर्वाधिक भुर्दंड सोसावा लागला आहे. युएस फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) फेसबुककडून तब्बल ५ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३५ हजार कोटी रुपये वसूल करणार आहे. यापूर्वी २०१२ मध्ये गुगलला सुद्धा २२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १५४ कोटी रुपयांचा भुर्दंड पडला होता. मात्र आपल्याला ही रक्कम मोठी वाटत असली तरी  फेसबुकने  हा दंड भरण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे .

एफटीसीने गोपनीयतेचे उल्लंघन आणि यूजर्सच्या डेटाचा गैरवापर असे आरोप फेसबुकवर लावले आहेत. त्यापोटी एवढा दंड बजावला आहे. मात्र फेसबुक आणि एफटीसी या दोहोंनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  सध्या हे प्रकरणी न्याय खात्याच्या सिव्हील विभागाकडे पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण आरोग्यविषयक क्षेत्रातील डेटालीकचं आहे.

यापूर्वी केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीद्वारे कोट्यवधी यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरल्याप्रकरणीदेखील एफटीसीने चौकशी सुरू केली आहे. २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक अभियानासाठी राजकीय सल्लागार कंपनी केम्ब्रिज अॅनालिटिका ने काम केलं होतं. केम्ब्रिज अॅनालिटिकाद्वारे फेसबुकने सुमारे ८.७ कोटी यूजर्सचा डेटा चोरी केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!