Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : मागास जातीतील तरुणाशी विवाह केल्याने आमदार पित्यापासून संरक्षण देण्याची मागणी

Advertisements
Advertisements
Spread the love

https://twitter.com/saurabh3vedi/status/1148980741105020928

Advertisements

मागास जातीतील  मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातीलभाजपाआमदाराच्या मुलीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा मुलीने केला आहे. उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने व्हिडीओच्या माध्यमातून  जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन एका मागास जातीतील तरुणाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचं तिने म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

साक्षी मिश्रा हिने घरच्या व्यक्तींपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. राजेश मिश्रा हे भाजपाचेआमदार आहेत. साक्षीने काही दिवसांपूर्वी पळून जाऊन अजितेश कुमार यामागास जातीतील तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांनी तिला मारायला गुंड पाठवल्याच साक्षीने व्हिडीओत म्हटलं आहे. अजितेशच्या नातेवाईकांना देखील त्रास देत असल्याचं सांगितलं.

पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. आमचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या. भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा’ असंही साक्षीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आपल्या नातेवाईकांपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी साक्षीने केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!