Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठी सिने रसिकांना ‘याड’ लावणाऱ्या आर्ची- परशाची कथा आता छोट्या पडद्यावर : ‘जात ना पूछो प्रेम की’

Spread the love

महाराष्ट्रातील मराठी सिने रसिकांना याड लावणाऱ्या , नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ ची लोकप्रियता अद्यापही काही कमी व्हायला तयार नाही . याच लोकप्रियतेचा फायदा गेट या चित्रपटाचा तेलगू आणि हिंदी रिमेक झाल्यानंतर आता छोट्या पडद्यावरही हा चित्रपट मालिकेच्या स्वरूपात येत आहे .

नागराज मंजुळे यांचा सैराट  २०१६ साली रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशाने प्रेक्षकांच्या मनात जणू घराचं केले. या चित्रपटातील गाणी तर अजूनही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत . या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’  असे नाव धारण करून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटालाही  सिने रसिकांची चांगलीच दाद मिळाली. त्यानंतर आता या चित्रपटाची हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे शीर्षक ‘जात ना पूछो प्रेम की’ असे या मालिकेचे नाव ठेवण्यात आले आहे.

या मालिकेत ‘शाकालाका बूम बूम’ या मालिकेतील अभिनेता किंशूक वैद्य आणि अभिनेत्री प्रणाली राठोड आर्ची आणि परशाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  ही कथा महाराष्ट्रातील आर्ची-परशाची असली तरी मालिकेसाठी हे कथानक उत्तर प्रदेशमध्ये घडताना पहायला मिळणार आहे. ‘जात ना पूछो प्रेम की’ या मालिकेची घोषणा करत अँड टीव्हीचे विष्णु शंकर यांनी ‘चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी आणि त्यासाठी टीव्ही सर्वांत उत्तम माध्यम असल्याचे म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!