राज ठाके पाठोपाठ उर्मिला मातोंडकर यांनीही “रोमियो ” च्या निमित्ताने मोदींना घेतले “रडार”वर ….

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बोलले आणि नेटकऱ्यांकडून ट्रोल न झाले तर नावलच म्हणावे लागेल. मग प्रश्न नाल्याच्या पाण्यावरून गॅस तयार करण्याचा असो कि त्यांनी दिलेल्या मुलाखती मधील कोणत्याही मुद्याचा विषय असो , मोदींची प्रत्येक गोष्ट या साठीच बारकाईने बघितली जाते कि , मोदी कुठे कधी आणि काय बोलतात आणि काय करतात ? मोदी आणि ट्रोल हे नटे आता नित्याचेच झाले आहे . अक्षय कुमारच्या मुलाखतीतही ते आंब्याच्या मुद्यावरून चांगलेच ट्रोल झाले. परवाच्या मुलाखतीत बालाकोट एअर स्ट्राइकवर भाष्य करताना रडारवर केलेल्या विधानावरुन नरेंद्र मोदींची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी यावरुन मोदींवर निशाणा साधला. यानंतर या गर्दीत राज ठाकरे यांच्यानंतर भर पडली आहे उत्तर मुंबई मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर . यांची त्यांनीही मोदींना ट्विटरवरून टोला लगावला आहे .
ट्विटरवर हॅण्डलवरून उर्मिला यांनी त्यांच्या कुत्र्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो डोंगरावर काढण्यात आला आहे. त्या फोटोवर त्यांनी म्हटले आहे कि , ‘आकाश निरभ्र असल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. यामुळे माझा कुत्रा रोमियोच्या कानापर्यंत रडारचे सिग्नल अगदी स्पष्टपणे पोहोचतील,’ यासोबतच त्यांनी या ट्विटसोबत एक फनी इमोजीदेखील जोडला आहे.
काय म्हणाले होते मोदी ?
पंतप्रधान मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘एअर स्ट्राइकच्या दिवशी हवामान चांगलं नव्हतं. आकाशात ढगाळ वातावरण होतं. एअर स्ट्राइकचा दिवस पुढे ढकलायला हवा, असं मत त्यावेळी काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं. त्यावेळी ढगाळ वातावरण आपल्यासाठी सहाय्यक ठरू शकतं, असं मी त्यांना सांगितलं. ढगांमुळे आपली लढाऊ विमानं शत्रूच्या रडारला दिसणार नाहीत, असं मी तज्ज्ञांना सांगितलं आणि आम्ही त्याच दिवशी एअर स्ट्राइक केला,’ असा दावा मोदींनी मुलाखतीत केला.