Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World cup : यजमान इंग्लंडचा पाकिस्तानकडून पराभव

Advertisements
Advertisements
Spread the love

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत केले.  त्यामुळे पाकिस्तानची सलग ११ पराभवांची मालिका खंडित झाली. जो रूट आणि जोस बटलर यांनी साकारलेली झुंजार शतके व्यर्थ ठरली.

Advertisements

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचे सलामीवीर फखर झमान आणि इमाम उल हक यांनी १४ षटकांत ८२ धावांची सलामी नोंदवली. मोईन अलीने ही जोडी फोडताना झमानला (३६) बटलरकरवी यष्टिचीत केले. त्याने इमामलाही ४४ धावांवर ख्रिस वोक्सकडे झेल देण्यास भाग पाडले.

Advertisements
Advertisements

बाबर आणि हफीझ यांनी २ बाद १११ धावांवरून मोर्चा सांभाळला. दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८८ धावांची भागीदारी रचली. मात्र मोईनने बाबरला ६३ धावांवर बाद केले.

पाचव्या क्रमांकावर आलेल्या सर्फराजने ४४ चेंडूंत ५५ धावा फटकावल्या, तर हफीझने ६२ चेंडूंत आठ चौकार व दोन षटकारांसह ८४ धावांची सुरेख खेळी साकारली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी आणखी ८० धावांची भर घातली. मार्क वूडच्या गोलंदाजीवर हफीझ माघारी परतला. अखेरच्या दोन षटकांत हसन अली आणि शादाब खान यांनी फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानने ५० षटकांत ८ बाद ३४८ धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडने ३४९ धावांचा पाठलाग करताना जेसन रॉयला (८) लवकर गमावले. त्यानंतर आलेल्या जो रूटने लौकिकाला साजेसा खेळ करत एकेरी-दुहेरी धावा काढण्यावर भर दिला. जॉनी बेअरस्टो ३२ धावांवर माघारी परतला. तर मॉर्गनही अवघ्या चार धावा करू शकला. त्यानंतर मात्र रूट आणि बटलर यांनी पाचव्या गडय़ासाठी १३० धावांची भागीदारी रचली. बटलरने ७५ चेंडूंत कारकीर्दीतील नववे शतक झळकावले, तर रूटने १०७ धावांची खेळी करताना १० चौकार व एक षटकार लगावला. मात्र रूट व बटलर दोघेही माघारी परतल्यामुळे इंग्लंडचा संघ पिछाडीवर पडला. वहाबने ४८व्या षटकांत दोन बळी मिळवत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!