Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World cup : पाकिस्तानचं इंग्लंडसमोर ३४९ धावांचं आव्हान

Advertisements
Advertisements
Spread the love

वेस्ट इंडिजविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाला सामोरं गेल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं आहे. नॉटिंगहॅमवर सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानने यजमान इंग्लंडला विजयासाठी ३४९ धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानकडून मोहम्मद हाफीजने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. बाबर आझमने ६३ धावा केल्या. सरफराज अहमदनेही अर्धशतकी योगदान दिलं. तर सलामीवर इमाम-उल-हक(४४) आणि फखर जमा(३६) यांनी ८२ धावांची भागीदारी रचून पायाभरणी केली. उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने ३०० चा आकडा ओलांडला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि मोइन अली यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मार्क वूडने दोन फलंदाजांना बाद केलं. जोफ्रा आर्चर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. आर्चरच्या १० षटकांत पाकच्या फलंदाजांनी ७९ धावा वसुल केल्या.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!