Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्तेपदाची धुरा कोणाच्या हाती आहे ? पुढे आले तीन तरुण

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली :  सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या तीन नवीन प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाच्या ‘कॉकरोच इज बॅक’ या अधिकृत एक्स खात्यावरून ही घोषणा करण्यात आली असून, हे प्रवक्ते जनतेशी आणि माध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी सांभाळतील.

Advertisements

1. सौरव दास (मुख्य प्रवक्ता)

सौरव दास हे एक शोध पत्रकार आहेत ज्यांना कायदेशीर, कायदेविषयक आणि सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीतील इंडिया गेट येथे झालेल्या प्रदूषण विरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपला उत्साह व्यक्त करताना म्हटले की, देशातील तरुण पिढी सध्या खूप रागात आहे कारण त्यांना केवळ भविष्याचे आश्वासन देण्यात आले आणि त्याबद्दल विचारणा केल्यावर त्यांची थट्टा उडवण्यात आली. आता ही पिढी स्वतः देशाचे भविष्य लिहेल.

Advertisements
Advertisements

2. विजेता दहिया

विजेता दहिया या एक राजकीय अभ्यासक , लेखिका, कंटेंट क्रिएटर आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी ‘पॉवर ऑफ युनिव्हर्स’ आणि ‘टू हेल विथ दॅट जॉब’ ही दोन सर्वाधिक खप असलेली (बेस्ट-सेलिंग) पुस्तके लिहिली आहेत. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेल्या विजेता यांनी ‘दरारें’ आणि ‘ओपरी पराई’ या हरियाणवी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे.

3. आशुतोष रांका

आशुतोष हे आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी लंडनमधील प्रसिद्ध मॅकिन्से अँड कंपनीमध्ये (McKinsey & Company) धोरणात्मक व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे. मागील वर्षी भारतात परतल्यावर त्यांनी जयपूरमध्ये पर्यावरण, शिक्षण आणि तरुणांशी निगडित अनेक जनआंदोलनांचे नेतृत्व केले. यामध्ये नीट पेपर फुटी, डोलचा पूर आणि अमायरा आत्महत्या प्रकरणाचा समावेश आहे.

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीला प्रख्यात पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची मोठी साथ मिळाली आहे. जर 5 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर 6 जून रोजी सीजेपीने आयोजित केलेल्या शांततापूर्ण आंदोलनात आपण सहभागी होऊ, असा इशारा वांगचुक यांनी दिला आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सध्या अमेरिकेत असून ते 6 जून रोजी भारतात परतणार आहेत आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने करणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!