Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : फ्रीजमध्ये आढळले गो मांस, गाय तस्करीत सहभाग असल्याच्या आरोपावरून ११ घरांवर फिरवला बुलडोझर

Advertisements
Advertisements
Spread the love

इंदूर : मध्य प्रदेशात गाय तस्करीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ११ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ, गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडे सापडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मध्य प्रदेशमधील आदिवासीबहुल जिल्हा असणाऱ्या मांडलाच्या नैनपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. तसेच, घरांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे नोटीसला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ होता, असे  प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही सर्व घरे सरकारी भूखंडावर बांधण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी ११ लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी संध्याकाळी नैनपूरमधील भैन्सवाही गावात ही घटना घडली. या घरांवर छापा टाकणाऱ्या पोलीस पथकाने ११ आरोपींपैकी एकाला अटक केली आहे. वाहिद कुरेशी असे या आरोपीचे  नाव असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपींपैकी ५ ते ६ आरोपींचा याआधीही गाय तस्करी प्रकरणात सहभाग आढळून आल्याचे  पोलिसांचे  म्हणणे आहे.

Advertisements

गायरान जमिनीवर बांधली होती घरे ….

दरम्यान मांडलाचे पोलीस अधीक्षक रजत सकलेचा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, हा १५००० चौरस फुटांचा भूखंड गायरान  क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेले आहे त्यावर ही घरे  बांधण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने या अतिक्रमणासंदर्भात या घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने या घरांवर कारवाई केली.

Advertisements
Advertisements

गाय तस्करीबाबत माहिती देताना ,  सकलेचा म्हणाले कि ,  “या गावात याआधीही गाय तस्करीची ५ ते ६ प्रकरणे  समोर आली होती. त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती. यावेळी आम्हाला माहिती मिळताच तीन पथकांनिशी आम्ही कारवाई केली. त्यांनी टाकलेल्या छाप्यात या घरांमधील फ्रीजमधून बीफ ताब्यात घेण्यात आले  आहे. त्याशिवाय जवळपास १०० जनावरे , जनावरांची हाडे घटना स्थळी आढळून आली.  यासेच येथून जवळपास १५० गायीदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत” .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील मांडला ते जबलपूर या भागात हे गाय तस्करीचं रॅकेट चालू होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एक नातेवाईक मोठा व्यावसायिक असून तो जबलपूरला राहतो. जनावरांची हाडे  सप्लिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येणार होती, तर मांस इतर उत्पादनांसाठी वापरले  जाणार होते .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!