Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RailwayAccidentNewsUpdate : पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १५ वर , ६० जखमी ….

Spread the love

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास  एका उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात १५  प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले आहेत.  कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला. सियालदहला जात असताना ही गाडी निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात धडक दिली.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या अपघातानंतर 19 ट्रेन रद्द करण्यात आल्या. या अपघातात १५  जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ६०  जण जखमी झाले आहेत. रेल्वे अपघाताबाबत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले, “माझ्याकडे माहिती मिळाल्यानुसार चार डबे रुळावरून घसरले. मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोललो आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.” पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जलपायगुडी येथील घटनास्थळी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेणार आहेत. जलपायगुडी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना रेल्वेने प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि कमी जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

https://x.com/AIRAAAOFFICIAL/status/1802580640258482196?

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. रुळावरून बोगी हटवून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कांचनजंगाच्या चार  बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. रंगपाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला. ट्रेन नुकतीच न्यू जलपाईगुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदहला जात होती.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी एक टीम पाठवली आहे. अपघात एवढा भीषण होता की, एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनवर चढली. या बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बोगी गॅस कटरने कापून काढण्यात येत आहेत.

https://x.com/AshwiniVaishnaw/status/1802568162669408307?

हेल्पलाइन नंबर

कटिहार हेल्पलाइन नंबर1-09002041952
2-9771441956

कटिहार स्टेशन हेल्प डेस्क नंबर
6287801805

न्यू जलपाईगुड़ी इमरजेंसी नंबर
916287801758

कंचनजंगा ट्रेन अपघाताबाबत माहितीसाठी सियालदह स्टेशन वरील हेल्पलाइन नंबर
033-23508794
033-23833326

लम्बडिंग स्टेशन हेल्पलाइन नंबर
03674263958
03674263831
03674263120
03674263126
03674263858

गुवाहाटी स्टेशन हेल्पलाइन नंबर
03612731621
03612731622
03612731623

आपलं सरकार

Click to listen highlighted text!