Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महामार्गांवर दरवर्षी पाच लाख अपघात होतात…

Advertisements
Advertisements
Spread the love

महामार्गांवरील वाहनांच्या नवीन वेगमर्यादेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे आणि राज्य सरकारांना विश्वासात घेऊन दुपदरी आणि चौपदरीसह विविध महामार्गांवरील नवीन वेगमर्यादा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Advertisements

https://www.facebook.com/dailymahanayak/videos/878253683625511

Advertisements
Advertisements

देशभरात महामार्गांवर दरवर्षी पाच लाख अपघात होतात. हे पाहता रस्ते अपघातांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या अपघातांमध्ये जितके लोक मरतात तितके लोक कोणत्याही साथीच्या रोगात, मारामारीत किंवा दंगलीत मरत नाहीत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी या वेळी दिली आहे. महामार्गांवर होणाऱ्या अशा अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत असून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कामासाठी सेलिब्रिटींचेही सहकार्य घेतले जात असल्याचे गडकरी म्हणाले. सरकार नवीन दर्जेदार असे रस्ते बांधण्याचे काम करत आहे. अशा रस्त्यांमुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल असे ते म्हणाले. या नवीन रस्त्यांच्या निर्मितीनंतर दिल्ली ते चंदीगडचे अंतर अडीच तासांनी कमी होईल, तसेच दिल्लीहून जयपूर, डेहराडून आणि हरिद्वारला दोन तासात पोहोचता येईल, अशी माहितीही गडकरी यांनी दिली आहे.

MaharashtraPoliticalUpdate । कुणीतरी आगीत तेल ओतण्याचे काम करतं…


News Update on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!