MaharashtraPoliticalUpdate । कुणीतरी आगीत तेल ओतण्याचे काम करतं…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बोलावली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि महाराष्ट्राने काय भूमिका मांडली याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरची आज ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज सर्वप्रथम मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार आम्ही मानतो. कारण, जी त्यांनी आज बैठक बोलावली, मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री व त्यांचे गृहमंत्री उपस्थित होतो. मागी काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकात ज्या काही घटना होत होत्या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, त्याचबरोबर मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये. अशाप्रकारची भूमिका राज्य सरकारची, आमची होती आणि गृहमंत्र्यांनीही या चर्चेत व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनीही ते मान्य केले.”
“दोन्ही राज्यांमध्ये, शांतता आणि सौहार्दाचे वातावरण व कुठल्याही प्रकारचा कायाद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांना दिल्या. जे काही मुद्दे आम्ही मांडले मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणसांचे कार्यक्रम यावर कुठल्याप्रकारचा अन्याय होता कामानये, अशाप्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे, त्याचा कुठेही अवमान होऊ नये याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे, अशी भूमिकाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही मान्य केले आहे.”
तसेच, आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या ट्वीटर आणि विधानांबद्दल मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चाही केली. त्यांनी त्यावर स्पष्टपणे सांगितले की हे माझे विधान नाही, ते ट्वीटर ह्रॅण्डल माझे नाही आणि अशा प्रकारचे कुठलेही विधान केलेले नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही स्पष्टपणे ही बाब मांडलेली आहे. कुणीतरी यामध्ये आगीत तेल ओतण्याचे काम करतं म्हणून मराठी माणसाच्या भावनाचा प्रयत्नही करू नये. शेवटी सगळ्यांनी मिळून एकजुटीने, कुठलाही पक्षीय भेद न ठेवता, पक्षीय राजकारण न करता मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीले पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त आपल्याला काय मदत करता येईल, ते सरकार करणार असल्याचे हि मुख्यामंत्र्यांनी या वेळी सांगितले.
MaharashtraPoliticalUpdate : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तात्पुरता तोडगा…
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055