Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NashikNewsUpdate : राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. प्राची पवार यांच्यावर हल्ला

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील नेत्या  डॉ. प्राची पवार यांच्यावर मंगळवारी रात्री उशिराने अज्ञातांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्राची पवार गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या त्या कन्या आहेत.नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन शिवारात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. प्राची पवार या तिथे त्यांच्या फार्म हाऊसमध्ये गेल्या असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरु केले आहे.


प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याचे कारण अस्पष्ट आहे. प्राची पवार ज्या फार्म हाऊसमध्ये येणार होत्या, त्या ठिकाणी हल्लेखोरांपैकी दोघेजण फार्म हाऊसलगतच्या झाडीत लपले होते. त्यांनी दुचाकी पवार फार्म हाऊसजवळ आणली. तेव्हा, प्राची यांनी त्यांना हटकले होते. तेव्हा, हल्लेखोरांनी पवार यांच्यावर हल्ला करुन पोबारा केला. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

मनी शंकर आय हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर गिरणारे रोडवरील त्यांच्या गोवर्धन येथील फार्म हाऊस जवळ हल्ला झाला आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून. त्यांना तातडीने सुश्रुत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. आरडा ओरडा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र हल्लेखोर तिथून पसार झाले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisements
Advertisements

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!