Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ५ हजार ६०९ नवीन रुग्ण , १३७ जणांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ६०९ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ७ हजार ७२० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, आज कोरोनाने आणखी १३७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा आता १ लाख ३४ हजार २०१ इतका झाला आहे.

Advertisements

दरम्यान राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६६ हजारांपर्यंत खाली आली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १३ हजार ८९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर त्याखालोखाल ७ हजार २९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सांगली जिल्ह्यात आहेत. सातारा जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ४६९, अहमदनगर जिल्ह्यात ६ हजार १९२, ठाणे जिल्ह्यात ६ हजार ७० तर मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ५०१ इतकी आहे.

Advertisements
Advertisements

कोरोना एक नजर

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८ % .
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ६६ हजार १२३ इतकी.
सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!