Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : जाणून घ्या पहिल्या टप्प्यात किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी  संपली असून, यासाठी तब्बल १८४ उमेदवारांचे अर्ज मिळाल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली.

Advertisements

पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २८ मार्चपर्यंत मुदत आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांत मतदान होईल.

Advertisements
Advertisements

दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या महाराष्ट्रातील दहा जागांवर मतदान होणार आहे. यापैकी सोलापूर, बीड, नांदेड मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी कालच अर्ज दाखल केले. दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी २९ मार्चपर्यंत मुदत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!