AurangabadCrimeUpdate : किरकोळ कारणावरुन खून, नवरा बायको फरार

औरंगाबाद – मिटमिटा येथे
शनिवारी सकाळी १०.३०वा.नवर्याने दारुच्या नेशेत तरुणाचा चाकू भोसकून खून करुन मयत झाल्यावर उपचार करणार्या घाटीतील डाॅक्टरांना बायकोने मयताचे खोटे नाव सांगून नवर्यासह फरार झालेल्या दांपत्यावर छावणी पोलिस ठाण्यात आज(रवि) खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण रघुनाथ चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिटमिट्यातील पारधीवस्तीवर लक्ष्मण चव्हाण हा शेजारचे संजू काळे,श्रीमंत काळे, क्रांती शिंदे यांच्या सोबंत मद्यपान करंत बसला होता. त्यावेळी संजू काळे बरोबर किरकोळ वाद झाल्याने संजू काळे ने लक्ष्मण चव्हाणवर चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर लक्ष्मण चव्हाण याला संजू काळे ची बायको उषा काळे हिने इतरांच्या मदतीने घाटी रुग्णालयात नेले तेथे उपचार सुरु असतांना लक्ष्मण चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यावेळी उषा काळे हिने लक्ष्मण चव्हाण यांना जखम टोकदार वस्तूवर घरातच पडल्यामुळे झाली असे सांगून मयताचे नाव लक्ष्मण बारकू काळे व स्वता:चे नाव पूजा काळे असे सांगून नवर्या सोबंत फरार झाली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात रविवारी आज गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पीआय मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पांडुरंग भागिले करंत आहेत.