भाजपचा धाकड नेता , ज्याला रस्ताही समजेना !! दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर ते एका महिलेसोबत केले निर्लज्ज वर्तन….

भोपाळ : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भाजप नेते मनोहरलाल धाकड यांच्यासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्यांचा सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करताना दिसत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासदंर्भात भानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये धाकड आणि ती महिला आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजप नेत्यांनी नकार दिली आहे. जास्त गोंधळामुळे भानपुरा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मंदसौर जिल्ह्यातील दलौदा तहसीलमधील बानी गावातील रहिवासी भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा लैंगिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्यासोबत एक महिला कपड्यांशिवाय दिसत आहे. ही संपूर्ण घटना दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
धाकड आणि ती महिला रस्त्यावर अतिशय लज्जास्पद अवस्थेत दिसत आहेत. हा व्हिडिओ 13 मे रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून हायवेवर उतरताना दिसत आहेत. यावेळी ती महिला कपड्यांशिवाय होती. वाहतूक विभागाच्या नोंदींमध्ये ही गाडी मनोहरलाल धाकड यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
पक्षाला अशा लोकांची गरज नाही: भाजप जिल्हाध्यक्ष
धाकड यांच्या पत्नी सध्या मंदसौर जिल्हा पंचायत सदस्या आहेत. त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. याबाबत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित म्हणाले की, पक्षाला अशा गोष्टी करणाऱ्या लोकांची गरज नाही. या प्रकरणाची सत्यता देखील पडताळली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर भाजपने मनोहरलाल धाकडवर मोठी कारवाई केली आहे. धाकडला युवा संघाच्या राष्ट्रीय मंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तपासात असे आढळून आले की हा व्हिडिओ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या भानपुरा पोलिस स्टेशन परिसरात चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडिओसंदर्भात भानपुरा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 296, 285, 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.