MumbaiCrimeUpdate : उद्वेगजनक : मुंबईत तीन वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार

मुंबईत तीन वर्षाच्या एका बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याबाबत तपास करत आहेत. आरोपींनी हा गुन्हा का केला? पीडित मुलीला ते कधीपासून ओळखत होते याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे.
#Maharashtra Three-year-old girl allegedly gang-raped by two minor boys, case registered under the POCSO Act. The two boys have been sent to a correctional home: Senior Police Inspector, Kasturba Marg Police Station, #Mumbai
— ANI (@ANI) November 21, 2020