AurangabadCrimeUpdate : २ लाख ८२ हजारांची सुगंधी तंबाखू जप्त

औरंगाबाद -अन्न औषध सुरक्षा अधिकार्यांच्या मदतीने जिन्सी पोलिसांनी रोशनगेट परिसरातील वाहेद काॅलनीत आज दुपारी अडीच वा.धाड टाकून पावणे तीन लाख रु.चा सुगंधीत पान मसाला व तंबाखू जप्त करंत व्यापार्याला अटक केली आहे.
अब्दुल अजीम अब्दुल मजीद(३६) असे अटक आरोपीचे नाव आहे.शहरात अन्न व औषध प्रशासनाला सोबंत घेत पोलिस गुटखा व इतर तंबाखू जन्य पदार्थांवर कारवाई करंत आहेत.अनेक गुटखा व्यापारी गजाआड झाले आहेत.या पार्श्र्वभूमीवर जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली.या कारवाईत पोलिसनिरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पीएसआय दत्ता शेळके पोलिस कर्मचारी हारुण शेख, संजय गावंडे, सुनिल जाधव यांनी सहभाग घेतला होता.