Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कोव्हिड सेंटर मधून पळालेला खून प्रकरणातील आरोपी बेगमपुरा पोलिसांकडून अखेर जेरबंद

Spread the love

औरंगाबाद – गेल्या जून महिन्यात किलेअर्क परिसरातील कोव्हिड सेंटर मधून खिडकीचे गज वाकवून व चादर लटकवून फरार झालेला  खुनाचा आरोप असलेल्या कैद्याला अटक करण्यात बेगमपुरा पोलिसांना यशआले आहे. अक्रमखान गयासखान(३०) रा.जटवाडा असे पुन्हा अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे.

हा न्यायालयीन कोठडीत असतांना त्यास कोरोना संसर्ग झाला होता. म्हणून हर्सूल कारागृह प्रशासनाने उपचारासाठीठेवण्यात येणार्‍या कैद्यांंना किलेअर्क परिसरातील एका इमारतीत ठेवले होते. ७ जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास पहिल्यामजल्यावरील खोलीतून खिडकीचे गज वाकवून बेडशीट च्या सहाय्याने अक्रमखान पळाला होता.

या प्रकरणी तुरुंग अधिकारी अंकुश काळेंच्या फिर्यादीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.खबर्‍याने पोलिस निरीक्षक सानप यांना अक्रमखान कटकट गेट परिसरातील मुजीब काॅलनीत आल्याची माहिती दिली होती. अक्रमखानला अटक करण्यास जाण्यापूर्वी सानप यांनी पोलिसआयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सोबंत एपीआय राहूल रोडे यांना नेण्याची सूचना केली.त्यानुसार पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून अक्रमखानला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

फरार असलेल्या काळात आरोपी अक्रम नाशिक, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या ठिकाणी फिरत असल्याचे पोलिसांना सांगितले. या कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन सानप, एपीआय राहूल रौडे, पोलिस कर्मचारी शेख हैदर, मंगेश मनोरे, नागेश पांडे, शरद नजन यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!