Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पोलिसआयुक्तालयाकडे महापालिकेची सव्वा तीन कोटी रु थकबाकी

Spread the love

औरंगाबाद – गेल्या एक दशकापासून  महापालिकेच्या इमारतीत पोलिस ठाण्यांचा संसार थाटणार्‍या पोलिसआयुक्तालयाने सव्वातीन कोटी रु.किराया थकबाकी ठेवली आहे.  महापालिकेच्या वरिष्ठ सुत्रांनी  हि माहिती दिली आहे.

महापालिका आयुक्तांनी मालमत्ताविभागाला या बाबत खडसावून जाब विचारल्यानंतर मालमत्ता विभाग पोपटासारखं बोलू लागला. गेल्या २०१०साला पासुन पोलिसआयुक्तालयाकडे अंदाजे ३कोटी २५लाख रु.भाडे थकलेले आहे. मालमत्ता विभाग भाडे मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही करंत आहेत. पण पोलिसआयुक्तालयाकडून ज्या इमारती किरायाने दिलेल्या आहेत. त्या इमारतींची परवानगी आहे का ? वैगरे अशा चांभार चौकशा करुन वेळ मारुन नेतात. हा प्रकार वरिष्ठ सुत्रांनी ऐकल्यावर मालमत्ता विभागाला याबाबत समायोजनाचा प्रस्ताव तयार करुन तो अतिक्रमण विभाग आणि अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवण्याचे आदेश दिले.तसेच त्याची एक एक प्रत नगर रचना विभाग आणि गृहविभागाला पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.यानुसार पोलिसआयुक्तालयाच्या बाबतीतील अहवाल अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या टेबलावर पडलेला आहे.

यावर तोडगा म्हणून मालमत्ता विभागाने महापालिका आयुक्तांकडे समायोजनाचा प्रस्ताव पाठवला आहे.त्या मधे म्हटले आहे की, महापालिका अतिक्रमण हटवतांना जे पोलिसबल वापरते त्या प्रित्यर्थ अदा करण्यात येणारे बील या पध्दतीने वळते करुन घ्यावे.शहरातील एकूण १७पोलिस ठाण्यांपैकी ७इमारती या महापालिकेने पोलिसआयुक्तालयाला भाडेतत्वालर दिल्या आहेत त्यामधे उस्मानपुरा पोलिस ठाणे, जालनारोडवरील निशाप्राईड,वाहतूक सहाय्यक आयुक्त कार्यालय, मीरा सलामी हाॅल पोलिसउपायुक्त झोन क्रं १पैठणगेट व आकाश हाॅल सेंट्रल नाका,झोन क्र.२ एन६सिडको, पोलिसआयुक्तालयाचे बांधकाम सुरु असतांना समर्थनगरात सावरकर चौकात घेतलेले कार्यालय, वेदांतनगर पोलिस ठाणे या इमारतींचा समावेश होतो. तर खाजगी इमारतीही ज्यामधे पुंडलिकनगर, हर्सूल, सातारा, जवाहरनगर, बेगमपुरा आणि दौलताबाद या पोलिस ठाण्यांचा समावेश होतो.त्यांचेही गेल्या जुलै पासुन भाडे थकलेले आहेत असे कळते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!