Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली 15 ते 20 जण बेपत्ता

Advertisements
Advertisements
Spread the love

बिहारमध्ये भागलपूर परिसरात गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 15 जण बेपत्ता झाले असून काही जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.

Advertisements

भागलपूर येथील गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तीनटंगा जहाज घाटाजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घाटावर काही मजूर आणि शेतकरी हे एका खासगी बोटीने शेतावर काम करण्यासाठी चालले होते. या बोटीवर 50 पेक्षा जास्त लोकं स्वार होती. बोटीत मर्यादेपेक्षा जास्त लोकं असल्यामुळे या बोट दुर्घटनाग्रस्त झाली असल्याचे वृत्त आहे. बोट बुडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन 30 लोकांना वाचवले आहे. यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून, आतापर्यंत 15 ते 20 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान बोट बूडत असताना काही जणांनी नदीत उडी मारून आपला जीव वाचवला तर काही जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले आहे. तसेच जखमी लोकांना गोपालपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!