Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अहमदाबाद येथे झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू , दोन गंभीर जखमी

Spread the love

अहमदाबादमध्ये बुधवारी कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागून  इमारतीत स्फोट झाल्यामुळे छप्पर कोसळले. या दुर्घटनेत १२  जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे . अन्य  दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एनडीआरएफच्या पथकाचे बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत चालू होते. या ठिकाणी २४ कर्मचारी कार्यरत होते. गोदामाशेजारी असलेल्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. या घटनेत १० जणांना वाचवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. या दुर्घटनेतील मृतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं .  नानुकाका इस्टेट येथील कपड्यांच्या गोदामात ही आग लागली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनेत १२ जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!