Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कारण -राजकारण : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाचा घोळ, मी ब्राह्मण असल्याने खापर माझ्यावर फोडताहेत : देवेंद्र फडणवीस

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेले असताना भाजपचे विरोधीपक्षनेते यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे . आपल्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तरे देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , मी जातीने ब्राह्मण असल्यामुळे काही लोक सगळं खापर माझ्यावर फोडले जात आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाचा घोळ झाला असा आरोप भाजपने केला आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत त्यामुळे हे आरक्षण रखडलं असे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहेत. या आरोपाचे देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझआ दिलेल्या विशेष मुलाखतीत खंडन केले.

Advertisements

आपल्या मुलाखतीत फडणवीस पुढे म्हणाले, मला असं म्हणणं शोभणारं नाही, मात्र मी स्पष्टपणे सांगतो की केवळ माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्या माथी सर्व काही आरोप केले तर चालतील असं काही लोकांना वाटतं. ते मोजकेच लोकं आहेत. मात्र आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला चांगलंच माहित आहे . मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे धक्कादायक आहे. मात्र या संदर्भात केंद्र सरकारकडे बोट दाखवनं योग्य नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. या प्रश्नावर राज्य सरकारला आपला पूर्ण पाठिंबा आहे असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याच्या  निर्णयावर आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले कि , मराठा आरक्षणाबाबत मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही मात्र सत्ताधाऱ्यांनी संभ्रम करणारी वक्तव्य टाळावीत.  आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का? हे आपल्याला कोर्टाला सांगायचा आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होत असताना आम्हाला स्थगिती का? हा मुद्दा आपण आता मांडायला हवा. इतर राज्यांप्रमाणे आपलाही कायदा टिकायला हवा. राज्य सरकार अंगावर काही घेत नाही. स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील. अध्यादेशाबाबत विधितज्ज्ञासोबत  चर्चा केली जाऊ शकते, कुंभकोणीएवजी थोरांतांकडे केस द्यावी, त्यांनी उच्च न्यायालयात केस जिंकली होती, असं देखील ते म्हणाले.

Advertisements
Advertisements

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करावं याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, दोन्ही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये. नेतृत्व दोघांनीही करावं. दोघांमध्ये नेतृत्वासाठी वाद नाही. त्यामुळं कुणी तसा वाद लावू नये. छत्रपती संभाजीराजे यांच्या पोलीस भरतीसंदर्भातील वक्तव्यात वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारनं भरतीचा निर्णय घेऊ नये. अशा प्रकारचा निर्णय घेताना सर्व घटकांशी चर्चा करावी. राज्याची स्थिती गंभीर असताना असे निर्णय घेताना विचार करावा. भरती करावी मात्र आता घाई नाही. आपण ही स्थगिती हटवू शकतो का यावर विचार केला जावा. एक महिना उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. याबाबत चर्चा तरी करावी. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता भरतीचा निर्णय योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.

मराठा समाजात प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित अशी एक लढाई आहेच. मराठा समाजातील एक मोठा घटक गरीब आहे, वंचित आहे. मराठा समाजातला एक वर्ग राज्यकर्ता आहे. तो समृद्ध आहे. मात्र दुसरा वर्ग उपेक्षित आहे, त्यांच्या मनात विस्थापित असल्याची भावना आहे. मात्र यासाठी मराठा आमदारांवर खापर फोडणं चुकीचं आहे. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीवर बोलताना ते म्हणाले कि , ज्याक्षणी हा निर्णय झाला  त्याक्षणी मी केंद्रीय मंत्री गोयल यांना फोन केला. निर्यातबंदीसाठी ही वेळ बरोबर नाही. त्यांनी याबाबत केंद्रानं एक मेकॅनिझम तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना निर्यातबंदी लावणं चूक आहे. मी याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. यातून काहीतरी योग्य निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!