AurangabadUpdate : तेलंगणाच्या हायकोर्टसारख्या सुविधा हव्यात, वकीलांची मुख्य न्यायधिशांकडे मागणी

औरंगाबाद -तेलंगणा हायकोर्ट ने वकीलांच्या खटल्यातील युक्तीवादासाठी मोबाईल व्हिडीओ काॅन्फरंसिंग सुविधा उपलब्ध करुन दिली त्यासारखी सुविधा महाराष्र्टातील हायकोर्टाने वकीलांसाठी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राज्यातल्या अडीचशे वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायधिशांकडे केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासुन कोव्हिड संसर्गामुळे देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे न्यायालयासमोरही वकीलांनी युक्तीवाद करण्याच्या नव्या कल्पना समोर येत आहेत.मुंबई उच्चन्यायालयाने शहरात खंडपीठामधे युक्तीवादासाठी उपलब्ध असलेल्या दोन व्हिडीओ काॅन्फरन्सिंग रुम वाढवून जास्त कराव्यात. जेणेकरुन प्रलंबित याचिका लवकरातलवकर निकाली निघतील.हायकोर्टात रेग्यूलर प्रॅक्टीस करणार्या वकीलांची संख्या दिवसेंदिवस वाढंत असल्यामुळे मॅटर ड्राफ्टिंग, इव्हीडन्स रैकाॅर्डिंग, यासाठी डिजीटल युक्तीवाद दालनांची खूप आवश्यकता आहे.यामुळे कोर्ट व्यवस्थापन आणि खटल्यांचे व्यवस्थापन सुसह्य होण्यास मदत होईल.