Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघात ४ टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.

Advertisements

पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक १८ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक २५ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २६ मार्च २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च २०१९ आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान ११ एप्रिल २०१९ रोजी होईल. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या ७ मतदारसंघात मतदान होणार आहे.

Advertisements
Advertisements

दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक १९ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक २६ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २७ मार्च २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २९ मार्च २०१९ आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान १८ एप्रिल २०१९ रोजी होईल. दुसऱ्या टप्प्यात बुलढाणाअकोलाअमरावतीहिंगोली,नांदेडपरभणीबीडउस्मानाबादलातूरसोलापूर या १० मतदारसंघात मतदान होणार आहे. 

तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २८ मार्च २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक ४ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी ५ एप्रिल २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ८ एप्रिल २०१९ आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान २३ एप्रिल २०१९ रोजी होईल. तिसऱ्या टप्प्यात जळगावरावेरजालनाऔरंगाबाद,रायगडपुणेबारामतीअहमदनगरमाढासांगलीसातारारत्नागिरी-सिंधुदुर्गकोल्हापूरहातकणंगले या १४ मतदारसंघात मतदान होणार आहे.

चौथ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक ९ एप्रिल २०१९ आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १० एप्रिल २०१९ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १२ एप्रिल २०१९ आहे. चौथ्या टप्प्यासाठी मतदान २९ एप्रिल २०१९ रोजी होईल. चौथ्या टप्प्यात नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर,भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व,मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७ मतदारसंघात मतदान होणार आहे.

सर्व चारही टप्प्यांमधील मतदानाची मतमोजणी ही २३ मे २०१९ रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक हा २७ मे २०१९ आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!