Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

समजून घ्या राज्यातील मतदान यंत्रणेची कार्यवाही आणि आदर्श आचार संहिता

Spread the love

मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाहीअसे सर्व नागरिक त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत दाखल करु शकतात.

१७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावेतसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावेअसे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

आदर्श आचारसंहिता

संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा, शासकीय सार्वजनिक /खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत.

सर्व राजकीय पक्षप्रसिद्धी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत  माहिती देण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे किंवा करु नये (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

सन 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या तुलनेत दिनांक दि.31 जानेवारी 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्रातील मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

पुरुष : 4,57,02,579 , महिला : 4,16,25,819, तृतीयपंथी : 2,086 एकूण: 8,73,30,484

मतदार यादी संदर्भातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत :-

सन 2014 सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये 65,31,661 इतकी वाढ झाली आहे.

सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 925 महिला (Gender Ratio) असे प्रमाण होते. त्या तुलनेत सन 2014 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 889 इतके होते.  2019 मध्ये या प्रमाणात 911 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

प्रथम मतदार 18-22 वर्षे 25,13,657 पुरुष, 17,32,146 महिला, 142 तृतियपंथी असे एकूण 42,45,945 नवीन मतदार नोंदणी झाली आहेत.

याशिवाय 1,04,435 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

सन 2014 साली मतदारांना वाटप करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार ओळखपत्राचे प्रमाण  90.43% तर सन 2019 मध्ये हे प्रमाणे 96.68 %इतके झाले आहे.

या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण 2,24,162 इतके अपंग मतदार समाविष्ट आहेत.

2014 साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी 60.32 %

मतदान केंद्र : ग्रामीण क्षेत्रातील मतदान केंद्रे : 55,814 शहरी भागातील मतदान केंद्रे : 39,659  एकूण मतदान केंद्रे : 95,473

महाराष्ट्रामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूकीमध्ये EVM-VVPAT चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2.15 लाख Bus(Ballot Unit), एकूण 1.24 लाख CUs(Control Unit) आणि एकूण 1.35 लाख VVPATs यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

हेल्पलाईन 1950

राज्यस्तरावर (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर  (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत.

मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यस्तरावर ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!