#CoronaVirusUpdate : औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या ६५१ वर , बेडची कमतरता नाही , स्वतःहून तपासणीसाठी पुढे या…

गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरात कोरोना ग्रस्त रोगांची संख्या सतत वाढत असून आज सकाळी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रस्तांची संख्या ६५१ झाली असल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे आज सकाळी आढळून आलेल्या या 2४ रुग्णांमध्ये पुंडलिक नगर २, एन ८ येथील १, रामनगर १, संजय नगर ५, प्रकाश नगर-१ , सिडको एन७ येथील ४ , एन ८, रोशन गेट, गांधीनगर, दत्तनगर, भडकलं गेट , चिकलठाणा, शहानुर मिया दर्गा येथे प्रत्येकी एक व अन्य ठिकाणचे दोन अशा रुग्णांचा यात समावेश आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. औरंगाबादेत करोनामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जण करोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णांची व्यवस्था , बेडची कमतरता नाही
गेल्या आठवडाभरापासून पूरग्रस्त रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होत असल्याने शहरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान नागरिकांनी आपल्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असतील तर तपासणीसाठी पुढे यावे जेणेकरून लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालयामध्ये कुठेही बेडचा तुटवडा नसून , सर्व शासकीय रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याच्या अफवेवर विश्वास ठेवू नये . शासकीय रुग्णालयात आलेल्या रुग्णांची पूर्ण व्यवस्था करण्यात प्रशासन समर्थ असण्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये दिली आहे.
आम्हाला रुग्णसंख्या ची भीती नाही
दरम्यान “महानायक ऑनलाईन” शी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, काही दिवस सध्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि माहितीनुसार कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत कमी अधिक वाढ होणे स्वाभाविक आहे. आम्हाला वाढत्या रुग्णांची काळजी नसून जे रुग्ण अद्याप वैद्यकीय उपचारांसाठी पुढे येत नाहीत त्यांच्याकडून शहराला अधिक धोका आहे त्यामुळे लोकांनी घाबरून जाता पुढे येऊन उपचारासाठी पुढे येण्याची गरज आहे .औरंगाबाद वैद्यकीय विभाग सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी समर्थ आहे. येत्या काही दिवसात संख्या कमी होणार असून पुढील महिन्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.