Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : राज्यातील एक हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा , ११३ कर्मचाऱ्यांवर यशस्वी उपचार

Spread the love

गेल्या चोवीस तासात राज्यातील 106 अधिकाऱ्यांसह तब्बल 901 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळून एकूण 1007 पोलीस कर्मचाऱ्यांना कोणाची लागण झाली असून यात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर  113 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे तर 887 उपचार करण्यात येत आहेत.
या संदर्भात गृह विभागाने दिलेल्या माहिती नुसार गेल्या चोवीस तासात तब्बल 221 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत दिवसाला 60 ते 70 पोलिसांना करणाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.  मुंबईत आतापर्यंत २०० हून अधिक कर्मचारी बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित पोलीस जेजे मार्ग पोलिस ठाण्यातील आहेत.   येथील 33 जणांना तोरणाची लागण झाली असून यामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.  दरम्यान  आर्थर रोड कारागृहात लॉकडाऊन  असले तरी कारागृहातील 26 पोलीस कर्मचाऱ्यांना आणि 158 कैद्यांना कोरोना ची लागण झाली आहे.
याशिवाय बंदोबस्ताच्या वेळी नागरिक आणि पोलिसात शाब्दिक चकमक आणि हाणामारी झाल्याने पोलिसांवरील हल्ल्यात 82 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यात एका होमगार्डचा ही समावेश आहे आतापर्यंत राज्यात पोलिसांवरील हल्ला प्रकरणात 207 गुन्ह्याची नोंद झाली असून 747 जणांना अटक झाल्याची माहिती गृह विभागाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!